शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (२)

पार्श्वभुमी...

                    या कथेमागचा खरा आनंद अनुभवण्यासाठी या कथेतल्या दोन्ही पात्रांची पार्श्वभुमी जाणुन घेणे गरजेचे आहे..म्हणुन हा पार्श्वभुमी लिहण्याचा अट्टाहास...पार्श्वभुमी लिहितेय म्हटल्यावर कथेतली पात्रं म्हणाली, "आम्हीच सांगतो की, आमची पार्श्वभुमी.." लगेच बायको उताविळपणे म्हणाली, "मी आधी सांगणार..पहिल्या रात्री तुला सांगितलं तसं...". नवरा शांतपणे म्हणाला,''बरं, तसं पण लेडीज फर्स्ट...". तीने लगेच सुरवात केली...

                 "मी आत्ताची सौ. रुचिरा गौरव जोशी, आणि आधीची कुमारी रुचिरा वैभव देशमुख...माझं नाव बदललं नाही गौरवनं...त्याला माझं नाव खुप आवडतं..तर मी मुंबईत जन्मले, वाढले. वाळकेश्वर सारख्या निसर्गरम्य परीसरात राहत होतो आम्ही..त्यामुळे लहानपणीचे संवगडी तसे उच्चभ्रु घरातलेच..आमचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय आणि त्रिकोणी..म्हणजे मी, आई आणि पप्पा...एकटीच मुलगी असल्यामुळे पप्पांनी खूप लाड केले..हवं ते मिळत गेलं लहानपणापासुन..त्यामुळे स्वभाव थोडाफार हट्टीच...पप्पा तर मला आपला मुलगाच समजायचे..त्यामुळे मी बोल्ड होते ब-यापैकी पण तितकीच बालीशही...घरातल्या कामांचा प्रचंड कंटाळा..वास्तविक आई-पप्पानी कधी सवयच लावली नाही कामाची...मित्र-मैत्रिणी पुष्कळ..खरं तर मित्रच पुष्कळ..मित्र खूप भेटले, पण सखा कुणी भेटला नाही..ज्याची सोबत आयुष्यभर असावी असं वाटेल, ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं असं वाटेल..वय वाढेल तसा समंजसपणा वाढत गेला..कॉलेजमध्ये गेल्यावर जगच वेगळं वाटायला लागलं..आणि इथेच माझा प्रेमाचा शोध संपला..पहिल्यांदा प्रेमात पडले..फक्त एवढंच सांगते कि गौरवची ओळख व्हायच्या आधी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते..म्हणतात पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही..पण तो सोडून गेला, मला एकटीला..आयुष्याच्या अश्या वळणावर..जिथुन एकटीला पुढे जाण्याची भीती वाटायला लागली..तिथेच रेगांळले खूप वेळ..त्याच वळणावर त्याला खूपदा शोधलं पुन्हा पुन्हा.. पुढे काय झालं ते माझी डायरी वाचुन तुम्हांला समजलेच..."
                असं म्हणुन ती आमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहायला लागली..म्हणाली, ''सगळंच सांगितलं तर माझी डायरी कोण वाचेल..?''
                गौरव तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागला..खरंच प्रेमात पडणा-या माणसाला सगळयाच गोष्टीचं कौतुक वाटतं..उदया ती साधं शिकंली जरी असती तरी त्याला तिचं कौतुक वाटलं असतं..असो..

                   मी गौरवला म्हटलं, ''आता तु सुरवात कर..''


                  '' मी गौरव पांडुरंग जोशी..आमचंही कुटुंब तसं छोटंसंच..मी, आई, बाबा, आणि माझी मोठी बहीण सुमित्रा..बेळगावमधल्या छोट्याश्या गावात माझा जन्म झाला...दहावी पर्यंतचं शिक्षण तिथलंच.रम्य या शब्दाला पुरुन उरेल असं माझं बालपण..मस्त विहिरीत पोहायचो..मी पोहायलो शिकलो तो मोठा किस्साच आहे..वाचायला मिळेल तुम्हांला, डायरीतल्या कुठल्यातरी पानावर..माझं गाव आणि माझं बालपण...पण, त्यामुळे मुंबईत आल्यावर बावचळलो..डिप्लोमा आणि डिगरी मामांच्या घरी राहुन पूर्ण केलं..खूप मित्र झाले..मुलींना फक्त पाहयाचो पण त्याच्यांबरोबर बोलण्याचं धाडस करू शकलो नाही..मैत्री तर खुप दूरची गोष्ट होती माझ्यासाठी...रूचाला पाहिलं आणि सगळं विसरलो..फक्त ती आणि फक्त तीच..'' मी गौरवला मधेच थांबवत म्हटलं,''अरे तुझ्याबद्दल सांग रे.." गौरव आपल्या गोंधळ्या नावाला सार्थकी लावत थोडासा गोंधळला...थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, ''हो हो..मी काय सांगू माझ्याबद्दल? मी रूचा सारखं आणखी कुणाच्या प्रेमात पडलो नाही.. तेवढा वेळच मिळाला नाही..सुमीचं लग्न झालं आणि मी एकटा पडलो..खूप पैसा कमावायाचा आणि मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं...मग लग्न करायचं असं सगळ्यांचं असतं तसं साधंसं स्वप्न होतं माझं..रूचा माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याची ध्येयं, धोरणं बदलून गेली..आता मी फक्त तीला सुखात ठेवण्यासाठी जगतोय...'' मी मनात म्हटलं, याची गाडी पुन्हा एकदा रूचा नावाच्या ट्रॅकवर यायच्या आधी थांबावायला हवी..मी त्याला म्हटलं, '' पुरे आता गौरव, आपण पुन्हा एकदा आपल्या डायरीकडे वळूया..." तो म्हणाला, '' ठिक आहे.."


नवरा:

१३.०३.२००४

                 आज दिवसभर कशातच लक्ष लागत नव्हतं..वाटलं मामांनी तरी फोन करून विचारायला हवं होतं..मामांचा भलताच हट्ट म्हणे कि आपली मुलाकडची बाजू..त्यांना फोन करू दे..माझा इथे जिव जातोय..कुणाला माझी काळजी नाही..सारखी ती माझ्या डोळ्यासमोर येत होती..तीचं ते गोड हसणं..तीला कदाचित हे माहितही नसेल कि तिच्या रेखीव पातळ ओठांवरचा तीळ मला किती बेभान करत होता..तीचे डोळे मला सतत शोधत होते..का मीच तीला शोधत होतो..वेडा झालो आहे मी तिच्यासाठी, तिच्या एका भेटीसाठी...एक फोटो तरी घ्यायला हवा होता तिचा..ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल..म्हणत असेल काय बावळट मुलगा आहे हा.. नुसता पाहतोय माझ्याकडे..पण तिला जाणिव असावी स्वतःच्या सौंदर्याची...म्हणतात सुंदर मुलींना खूप गर्व असतो स्वतःच्या सौंदर्याचा..पण ही तशी नसावी..आणि असला जरी गर्व तरी त्यात काय गैर आहे...ती आहेच तेव्हढी सुंदर..मामा म्हणत होते, बघ विचार कर मुलीची उंची थोडी कमी वाटते...जाणवलं मला ते..पण तिचा चेहरा पाहिला आणि आणखी काही मला दिसलंच नाही...मगाशी गच्चीत उभा होतो तेव्हा चांदण्यांतून चालत चालत ती माझ्याकडे आली..मी स्तब्ध उभा होतो..हाताची घडी घालून..जणू तीचीच वाट पाहत होतो..ती आली आणि कठडयाला टेकून माझ्या शेजारी उभी राहली..त्या चांदण्यासारखीच मौन.. ह्या गडद पिठूळ चांदण्यानं जादू केली होती... हाताला लागेल का गं हे चांदणं? मी वेडयासारखा हात फिरवून पाहिला..चांदण्याचा स्पर्श होत नाही...ते फक्त जाणवतं..खरं सांगु तर तूही मला जाणवतेस सारखी पण तूझा स्पर्श माझ्या नशिबात आहे कि नाही माहीत नाही...तिला उदया फोन करायचं ठरवलं आहे मनात..
                                                                                
                                                                                                                                                     क्रमशः

१० टिप्पण्या:

Deepak Parulekar म्हणाले...

छान वाटली डायरी. पण पार्श्वभुमी फार कन्फ्युझ्ड करते. नक्की समजत नाही. कोण काय बोलतं ते !! वेल किप इत अप ! आणि हे क्रमशः वैगरे आवडत नाही आपल्याला. लवकर संपव बरं !

सारिका म्हणाले...

मला वाटतं तू याच्याआधीचे २ भाग निट वाचले नाहीस...असो..प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..!!

डायरीची आत्ता तर कुठे सुरवात झाली आहे..बघु लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करते..

SUSHMEY म्हणाले...

maastach

सारिका म्हणाले...

thnks sushamey

sandeep म्हणाले...

हाय सारीका !
तुझा मेल मिळाला . तु तुझ्या ब्लॉग वरील नविन पोस्ट बद्द्ल माझं मत विचारलं आहेस. . . . . . . .. ठिक आहे.
डायरी ची पार्श्वभूमी मी वाच्ली . . . . .. कदाचित पुर्ण डायरी वाचल्या नंतर मी खरं खरं मत देउ शकेन
पण तरी सुध्दा जे वाचले त्या बद्दल सांगतो.
तु खरंच डायरी लिहीतेस का ? की तुझ्या अंतरी च्या भावना व्यक्त करण्यासाठी हा मार्ग निवडला आहे.
सारीका . . . . . . जर डायरी च कथानक तुझ्या आयुष्याशी निगडीत असेल तर एक नक्की सांगतो. तु तुझा भूतकाळ डायरीच्या माध्यमातून मांडतेय . तुझा भूतकाळ नक्कीच तुला हेलावून सोडणारा असला पाहीजे . काही केल्या त्या जून्या आठवणी मनातून जात नाहीत
डायरीत अजून बरच काही येणार आहे. डायरीतल्या बायकोच्या पुर्व आयुष्यात अनेक रम्य घटनांनी भरलेल आहे. .
डायरीतील बायको खूप स्वप्नाळू . अन् रसिक वाटतेय. तीला अपेक्षित असणारं असं प्रेम तिला व्यक्त करता आलं नाही ही तिची खंत वाटते आहे. तिच्या पुर्व आयुष्यातल्या जोडीदारा कडून तिला समजून घेण्या बद्दल च्या तिच्या अपेक्षा कदाचित अपूर्ण राहील्या असाव्यात.
तिचा आत्ताचा असणारा जोडीदार तिच्यावर खूप प्रेम करतो. पण त्याची तुलना त्याच्याशी होउ नाही शकणार . . . . . . .
डायरीचे कथानक जर काल्प्निक असेल तर . . . . अन् त्याचा तुझ्या आयुष्याशी काही संबंध नसेल तर तु एक फार छान साहित्यिक अविष्कार जन्माला घालत आहेस . . . . . . . . . . पण मला खात्री आहे की हे काल्पनिक नसावे . थोडं फार त्यात तुझ्या आयुष्याचं त्यात प्रतिबिंब आहे.
( इतकं प्रेम करावंच कशाला ? की विसरणं आणि जगण्म अवघड होउन बसेल )
प्रेमाच्या बाबतीत माझा अनूभ्व खूप वाईट आहे. प्रेम करून मी आयुष्याची माती केली . आता कायमचा लंगडा होउन बसलो आहे.
तीला विसरता विसरले जात नाही अन तिच्या शिवाय कुणी आवडत नाही . ती मात्र मला सोडून कधिच निघुन गेली . प्रेमाच्या बाबतीत मी इतकेच म्हणेण
" हमने जफा ना सिखी
उनको वफा ना आइ "
" पत्थर से दिल लगाया
और चोट दिल पे खाइ "
असो . . . . ..
नेहमी प्रमाणे तुं लेखन छान अन् टवटवीत होतं
तुझा वाचक
संदीप

Unknown म्हणाले...

डायरी खूप चांगली आहे.
मला रुचीराची पार्श्वभूमी आवडली. कारण तिच्या आयुष्यात पहिलं प्रेम येवून गेल.
आणि तिने बिनधास्त पणे मांडलं आहे. तरी सुद्धा तिच्या नवर्याने ती ला स्वीकारलं.
एखाद्या माणसाचा भूतकाळ माहिती असून सुद्धा स्वीकारणे म्हणजे अभिमानस्पद आहे.
बस मी एवढच बोलतो. कारण तुझी आजून डायरी लिहायची बाकी आहे.
best..................

सारिका म्हणाले...

धन्यवाद संदीप..तुला ही माझी स्टोरी वाटतेय.. ही खरं तर माझ्यासाठी मोठी compliment आहे..

सारिका म्हणाले...

धन्यवाद भरत...प्रेमात कसल्याच अपेक्षा नसतात रे..त्याला ती आवडते अगदी मनापासुन..फक्त तिच्या वर्तमानकाळासोबतच नाही तर भूतकाळासोबत सुद्धा..

Unknown म्हणाले...

प्रेमात अपेशा असतात. जर समोरच्या कडून कसली अपेशाच नसेल तर प्रेमाला काही अर्थ नाही.

तू मला दिलेली टिप्पणी मला जरा अवघड वाटते.

सारिका म्हणाले...

अरे भरत..अपेक्षा असतात रे मान्य आहे मला..पण या कथेतल्या नव-याच्या अपेक्षा नाहीत आपल्या बायको कडून...मला एव्ह्ढचं सांगायचं आहे..