सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

पिवळ्या जगात...!!!





नेहमी व्हॅलेन्टाईन डे ला त्याच्यासाठी एक पत्र लिहिते...आजही लिहलं आहे...


प्रिय....,

               व्हॅलेन्टाईन डे येतो आणि तू मला येलो रोझेस सकट आठवतोस... यादिवशी एकमेकांना फक्त पाहण्यासाठी आपण तडफडायचो...

                  बरेच दिवसांचा अबोला आज संपवावासा वाटतोय...व्हॅलेन्टाईन डे एक निमित्त्...तूझ्याशी बोलायचंय..आज तुझीच परवानगी मागण्यासाठी पत्र लिहत आहे...


                 खूप प्रेम केलं आपण एकमेकांवर..पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू खूप आकडू वाट्लास...फर्स्ट इम्प्रेशन इझ लास्ट इम्प्रेशन..मारे लोक कितीहि बोंबा मारूदेत....लोकांच्या अगदी विरूद्ध अनुभव आहे माझा या फर्स्ट साईट इम्प्रेशनचा...फर्स्ट इम्प्रेशन इझ नॉट लास्ट इम्प्रेशन...तू त्यानतंर कधीच आकडू वाटला नाहिस...एकमेकांची ओळख झाली..मैत्री झाली..पण सुरवातीला आपण खूप भांडायचो ना रे..?..मागच्या जन्माच्या देणेकरासारखं...प्रेमावरून नेहमी भांडायचो...आता ते आठवलं तरी हसायला येतं..तू म्हणायचास प्रेम वगैरे काही नसतं..आणि मी प्रेमाचा खूप अनुभव असल्यासारखं म्हणायचे..तू प्रेमात पडलास कि समजेल तूला....कॉलेजमधले ते गुलाबी दिवस लवकरच संपले...तू जॉबला लागलास..आणि मीही...तरीही आपण वेळ काढून भेटायचो...तूझी गाणी..तूझी नाट्यसंगीतं..खरंच परत येतील का रे ते दिवस...?

                तू तूझ्या गर्लफ्रेंन्ड्नी दिलेल्या चॉकलेट्चं रॅपर जसं जपुन ठेवलंस तसं मीही तू दिलेलं पिवळं गुलाब अजुन जपुन ठेवलंय..तूझ्या प्रेमासारंखं सुखलंय म्हणा ते ही...!! पण माझ्या मनात अजुनही ते तितकंच टवटवीत आहे..आजही...!!!

                असो..तर पत्र लिहणं आपल्या प्रेमाचा एक मोठा भाग होता.. नेहमी एकमेकांना पत्र लिहायचो आपण...कधी रुसवा, राग (जो नेहमी मलाच यायचा..), कधी भांडण बरंच काही असायचं माझ्या पत्रामधे...आणि तूझी पत्रं नुसती प्रेमाने भरलेली असायची..आणि माझ्या स्तुतीने...!!

                   तूला कसं एवढं छान सुचायचं... हे कोडं मला आजही पडतं...तू आजही तितकंच छान लिहत असशील..मला खात्री आहे...पण ते माझ्यासाठी नसेल एवढीच खंत आहे...

                 तूला आठवतं का रे..सगळंच...पैसे नसताना एका वडापाववर अख्खा दिवस घालवायचो आपण...ती वरळीची वैशाली मधली मिसळ...आज कुठे आणि काय काय खात असते मी पण त्या वडापावची चव येत नाही रे त्या पाच तारे लावलेल्या हॉटेलच्या जेवणाला...दिवसभर नुसते उन्हात भटकायचो...बसला पैसे नसायचे म्हणुन चालत फिरायचो...खरंच किती वेडेपणा करायचो ना आपण..कमावायलो लागलो आणि सगळं संपलं...उन्हात फिरणं आणि चालणं सुद्धा..

                   आपला पहिला मुव्ही आठवतोय तूला...लेक्चर बंक करून बघितलेला...माझा हात मी तूझ्या हातावर ठेवलेला..तू तर थंड पडलेलास...किती निरागस वाटून गेलास त्यावेळी...म्हणालास मी पहिल्यांदाच आलोय एखाद्या मुलीसोबत मुव्ही बघायला...कितीतरी आत्मविश्वास वाढला होता तूझा, मला पहिल्यांदा मिठीत घेतलंस तेव्हा..तूझा स्पर्श अंगावर शहारे उठवत होता..केवढी उबदार होती तूझी मिठी...आजही तितकीच हवीहवीशी वाटणारी..आधार देणारी...अंगावर रोमांच उभी करणारी...आठवून बघ..शेवटचं कधी मिठीत घेतलं होतंस मला..?

                 आपल्या दोघांचा आवडता पाऊस..समुद्र..गाणी..पावसात भिजताना...समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना...आपल्या दोघांची गाणी गुणगुणताना...तू आठवतोस...आठवत राहतोस....मला हसवण्यासाठी किती उचापती करायचास तू...? रागावल्यावर कित्ती वेळा सॉरी बोलायचास...मी हसेपर्यत माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहायचास..तू मला खूप आवडायचास तेव्हा...माझी सततची बड्बड ऐकून तू कंटाळ्लास ना रे..?

                खूप प्रेम करतोस माझ्यावर माहितेय मला...पण हा अबोला मिटवून एकदा तरी सांगून बघ...तूझ्या सो कोल्ड कॉर्पोरेट लाईफ मधुन माझ्यासाठी थोडासा वेळ काढशील का?...थोडासा जुना तू हवा आहेस मला...मनापासुन खळखळून हसणारा...

मी तूझ्यावर खूप प्रेम करते...

तुझ्या सोबतीशिवाय...

काहीच शक्य नाही बघ..!!

तू,

तुझं आयुष्य

आणि

तुझ्या अस्तित्वाचा

एकेक क्षण..

ह्यातच माझं अवघं आयुष्य सामावलंय...!!!

चल ना पुन्हा एकदा त्या आपल्या पिवळ्या जगात...!!!

                                                                                       
                                                                                तुझीच आणि फक्त तुझीच..,



२३ टिप्पण्या:

प्रशांत दा.रेडकर म्हणाले...

सारिका छान लिहिले आहेस
:-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/

साधक म्हणाले...

हम्म..भावुक व प्रामाणिक. छान शब्दात मांडली आहे तगमग.

सारिका म्हणाले...

धन्यवाद प्रशांत..!!

मी तुझा ब्लॉग नक्की वाचेन...

सारिका म्हणाले...

आभार साधक...!!

अनामित म्हणाले...

सारिका,

I was crying, dear...

त्यालाही वेळ नसतो मला साधा msg ही नाही केला काल, म्हणून मी पण त्याच्यासाठी काही लिहिलेय, असेच काहीतरी आहे त्यात,

First impression is not last impression हे सुद्धा लिहिलेय. His first impression was 'Such a Flirt!!!' पण तो अजिबातच नाहीये.

माझ्यासाठी थोडासा वेळ काढ असे लिहिलं सुद्धा, पण पत्र अजुन दिले नाहीये

आणि आज सकाळ-सकाळ msg आला पण...

तुलाही येइल... शुभेच्छा.

---प्रिया.

सारिका म्हणाले...

धन्यवाद प्रिया...!!

तुला msg आला...मस्तच...व्हलेन्टाईन छान साजरा करा...

तूला तुमच्या गोड भविष्यासाठी शुभेच्छा...!!!

THEPROPHET म्हणाले...

छान लिहिलं आहे! भावना सुंदर शब्दांत पोचल्या!

सारिका म्हणाले...

धन्यवाद विद्याधर...!!!

Yogesh म्हणाले...

मस्त लिहल आहे...आवडल

सारिका म्हणाले...

आभार योगेश....!!

sandeep म्हणाले...

हाय सारीका

छान लिहिले आहेस . तुला भावनांच प्रकटीकरण चांगल करता येतं

पण . . . . . ? . . असु दे . . . . . परत कधी तरी सांगेन !

तुझ्या लेखनाला एक नविन आयाम देण्याविषयी . . . .

संदीप

सारिका म्हणाले...

धन्यवाद संदीप....!!

अनामित म्हणाले...

hi its cool .... but i m very unlucky person bcoz i was love one girl but she marry another man.... whats the point i till not understand....

AJ Khare म्हणाले...

सारिका, मस्त लिहिला आहेस...:)

सारिका म्हणाले...

धन्यवाद खरे साहेब...!!

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह... सुंदर शब्द. एक एक शब्द मनातल्या भावना हळूवार उलगडून सांगतोय. अप्रतिम.

सारिका म्हणाले...

धन्यवाद..सु झे..!!

महेश सावंत म्हणाले...

मस्त लिहलं आहेस

सारिका म्हणाले...

खूप खूप आभार महेश....!!

अनामित म्हणाले...

सॉलिड व्यक्त केल आहेस शब्दात सर्व.... मस्तच ...!!!

सारिका म्हणाले...

धन्यवाद देवेन...!!

Unknown म्हणाले...

nice story.

सारिका म्हणाले...

Thnks rushi...!