रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

खेळ नशीबाचा...



अंगणात माझ्या...

सडा पारिजातकाचा..

कधीतरी रंग बदलतो..

आयुष्यातल्या सर्व फुलांचा..

कोण म्हणतं फुलं बोलत नाहीत..

त्यांनाही कधी कधी येत असेल कंटाळा,,,

आपल्याच आयुष्याचा...

मग कोणासमोर मांडतील..

हिशोब आपल्याच वेदनांचा..

कुणाचं प्राक्तन कुणाला चुकलं...

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

कुणी देवाच्या पायावर, तर कुणी तिरडीवर..

तर कुणी चुरगळलेल्या चादरीवर..

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

khup khup chan aahe
" khel nashibacha "

सारिका म्हणाले...

bharat: dhanyawad..

Unknown म्हणाले...

तू '' नशिबाचा खेळ '' मांडलास..........
आता कोणता खेळ मांडणार आहेस ?

सारिका म्हणाले...

bharat:सध्या तरी काहितरी लिहिण्याचा खेळ मांडत आहे..बघुया अजुन कसले कसले खेळ मांडता येतात ते..?

अनामित म्हणाले...

छान झाली आहे कविता....आवडली...

सारिका म्हणाले...

davbindu: धन्यवाद...

mahesh sawant म्हणाले...

"नशिबाचा खेळ" chaan aahe aata pudhe kay?????????

सारिका म्हणाले...

thnks mahesh...aata baghu mazya nashibat ajun konate konate khel mandata yetat...